जास्तीजास्त भांडवल खेळतं करा
-----------------------------------------
मला एक मोठं कुटुंब भेटावयास आले. एक लहान भाऊ, दोन विवाहित भाऊ, एक बहीण, आई. दोन भाऊ कुठेतरी छोटीशी नोकरी करत होते. बहिणीचा नवराही खाजगी नोकरी करत होता. वडिलांचं ३ वर्षांपूर्वी निधन झालं होतं. लहान भावाचं इंजिनीअरिंग झालं होतं. त्याला नोकरीत रस नव्हता त्याला व्यवसाय करायचा होता, पण भांडवल नव्हतं. कुटुंबाच्या एकत्रित ५ ठिकाणी प्रॉपर्टीज होत्या, त्यामध्ये जुनी घरे, चाळी, जमीन इत्यादी बर्याच ठिकाणी वाद होते, टायटल क्लिअर नव्हते, धड त्या विकता येत नाहीत आणि डेव्हलपही करता येत नाहीत किंवा लोन मिळत नव्हते. योग्य वेळी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता. ७/१२ व ८अ वर अजून त्या मुलांच्या आत्यांची नाव होती. काही जागा पगडी पध्दतीने भाड्याने दिली होती. एकूण प्रॉपर्टीची व्हॅल्यूएशन ३ कोटीपर्यंत होतं, पण एवढ्या संपत्तीचे मालक दोघे भाऊ १२-१५ हजार रुपये पगाराची नोकरी करत होते व चाळीतल्या खोलीत राहून कसेतरी उदरनिर्वाह करीत होते. विवाहित बहीणीची तीच अवस्था. ती एका कंपनीत कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होती. हे जेथे नोकरीस होते त्या मालकांपेक्षा यांची संपत्ती जास्त होती. लहान भाऊ आधुनिक विचारांचा होता. त्याला नवीन तंत्रज्ञान, व्यापार याची जाण होती, इतर व्यापारी समाज कसे पुढे चालले आहेत, हे त्याला कळत होते, पण कुटुंबाची ३ कोटींची प्रॉपर्टी असून सुध्दा त्याला १५-२० लाख रुपये भांडवल उभे करणे शक्य नव्हते.
अशी अनेक मराठी कुटुंबे आहेत. ज्यांची चांगली संपत्ती आहे, पण त्याचे व्यापारात खेळतं भांडवल म्हणून उपयोग होत नाही. त्यामुळे संपत्ती किंवा भांडवलाची ताकद असूनसुध्दा नियोजन किंवा उद्योग व त्यात खेळत्या भांडवलाचे महत्व माहित नसल्यामुळे व संपत्तीविषयी योग्य कायदेशीर बाबी योग्य वेळी न हाताळल्यामुळे बहुसंख्य श्रीमंत मराठी माणसे छोट्या मोठ्या नोकर्याच करत आहेत. ३ कोटी रुपये भांडवल जर आज चांगल्या रीतीने व्यवसायासाठी वापरले, तर वर्षाला किमान १० ते १२ कोटींचा टर्नओव्हर सहज करता येईल. त्यामधून किमान २ ते ३ कोटींचा निव्वळ नफा राहू शकतो, म्हणजे प्रत्येक वर्षाला संपत्ती दुप्पट होते. समजा तुमच्याकडे घर घेण्यासाठी ५० लाख रुपये असतील, तरीसुध्दा होम लोन काढून घर घ्या व पैसे व्यापारामध्ये खेळते भांडवल म्हणून वापरा त्यात तुम्ही दोन कोटींचा व्यवसाय करून वर्षात ३० लाखांपर्यंत नफा कमवता येईल. सहा लाखात २० तोळे सोने घेण्यापेक्षा ते बँकेत ठेवा त्यावर लोन घ्या व खेळत भांडवल म्हणून वापरा. जितके जास्त खेळते भांडवल धंद्याला वापराल, तितका जास्त टर्नओव्हर कराल व जास्त फायदा मिळवत राहाल.
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
सदैव आपला,
प्रसन्न कुमार नेवे.

No comments:
Post a Comment