सर्वसाधारण १९ व्या शतकात लॉं ऑफ अॅट्रॅक्शन ही फिलॉसॉफी उदयास आली. २० व्या शतकात नेपोलियन हिलच्या ‘थिंक अँड ग्रो रीच’ व लुईस हे च्या ‘यु कॅन हिल युवर लाईफ’ या गाजलेल्या पुस्तकाने या फिलॉसॉफीला जगभर पोहचवण्याचे मोठे कार्य केले. ज्यांना स्वतःच्या शैक्षणिक जीवनात व उद्योगात परमोच्च यश गाठायचे आहे त्यांना ही फिलॉसॉफी समजणे, शिकणे व आत्मसात करणे खूप महत्वाची आहे. शाहरुख खानचा एक डायलॉग आहे कि, “अगर किसी चीज को दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश मे लग जाती है।” हा डायलॉग सुध्दा लॉ ऑफ अॅट्रॅक्शनच्या फिलॉसॉफीवर आधारित आहे. पावलो कोएलोची द अलकेमिस्ट ही कादंबरी सुध्दा तंतोतंत ह्याच फिलॉसॉफीवर आधारित आहे. तब्बल ६० ते ७० भाषेत मिळणारी व ७ ते ८ कोटी खपलेली या जगप्रसिध्द कादंबरीने खपाचे अनेक रेकॉर्ड केले. ज्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे त्याने ही जरूर वाचावी.
जर तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडावी असे वाटत असेल उदा. चांगली मुलगी जीवन साथीदार म्हणून मिळावी, चांगली नोकरी मिळावी, मोठ्या उद्योगाचे मालक व्हावे, एखाद्या स्पर्धेत गोल्ड मिडल मिळावे, शाळेत पहिला नंबर यावा इत्यादी काहीही आणि हे जर तुमच्या मनाला व शरीराच्या प्रत्येक अणू रेणूला वाटत असेल, तर निसर्गतः तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी मिळण्यासंबधित घटना आपोआप घडत जातात. असे का होते ते सांगणारे शास्त्र व फिलॉसॉफी म्हणजेच लॉ ऑफ अॅट्रॅक्शन होय. ज्याच्या खिशात आज १ रुपयाही नाही व त्याने ही फिलॉसॉफी समजून काम सुरू केले, तर तो कोट्याधीश होऊ शकतो, ज्याला हवे ते परमोच्च यश मिळू शकते, त्याला हवी ती प्रिय व्यक्ती जीवनात आणू शकतो, हव्या त्या देशात प्रवास करू शकतो. शाळेत हवे तेवढे गुण मिळवू शकतो. स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवू शकतो हवी तेवढी संपत्ती, जमीन, बंगले घेऊ शकतो, नाव आणि प्रतिष्ठा मिळवू शकतो. लॉ ऑफ अॅट्रॅक्शन शिका व जीवनात व उद्योगात प्रचंड यश मिळवा.
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
आपला परमस्नेही,
प्रसन्न कुमार कानळदेकर(नेवे).

No comments:
Post a Comment