Tuesday, December 25, 2018

जास्तीजास्त भांडवल खेळतं करा

जास्तीजास्त भांडवल खेळतं करा
-----------------------------------------
मला एक मोठं कुटुंब भेटावयास आले. एक लहान भाऊ, दोन विवाहित भाऊ, एक बहीण, आई. दोन भाऊ कुठेतरी छोटीशी नोकरी करत होते. बहिणीचा नवराही खाजगी नोकरी करत होता. वडिलांचं ३ वर्षांपूर्वी निधन झालं होतं. लहान भावाचं इंजिनीअरिंग झालं होतं. त्याला नोकरीत रस नव्हता त्याला व्यवसाय करायचा होता, पण भांडवल नव्हतं. कुटुंबाच्या  एकत्रित ५ ठिकाणी प्रॉपर्टीज होत्या, त्यामध्ये जुनी घरे, चाळी, जमीन इत्यादी बर्‍याच ठिकाणी वाद होते, टायटल क्लिअर नव्हते, धड त्या विकता येत नाहीत आणि डेव्हलपही करता येत नाहीत किंवा लोन मिळत नव्हते. योग्य वेळी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता. ७/१२ व ८अ वर अजून त्या मुलांच्या आत्यांची नाव होती. काही जागा पगडी पध्दतीने भाड्याने दिली होती. एकूण प्रॉपर्टीची व्हॅल्यूएशन ३ कोटीपर्यंत होतं, पण एवढ्या संपत्तीचे मालक दोघे भाऊ १२-१५ हजार रुपये पगाराची नोकरी करत होते व चाळीतल्या खोलीत राहून कसेतरी उदरनिर्वाह करीत होते. विवाहित बहीणीची तीच अवस्था. ती एका कंपनीत कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होती. हे जेथे नोकरीस होते त्या मालकांपेक्षा यांची संपत्ती जास्त होती. लहान भाऊ आधुनिक विचारांचा होता. त्याला नवीन तंत्रज्ञान, व्यापार याची जाण होती, इतर व्यापारी समाज कसे पुढे चालले आहेत, हे त्याला कळत होते, पण कुटुंबाची ३ कोटींची प्रॉपर्टी असून सुध्दा त्याला १५-२० लाख रुपये भांडवल उभे करणे शक्य नव्हते. 

अशी अनेक मराठी कुटुंबे आहेत. ज्यांची चांगली संपत्ती आहे, पण त्याचे व्यापारात खेळतं भांडवल म्हणून उपयोग होत नाही. त्यामुळे संपत्ती किंवा भांडवलाची ताकद असूनसुध्दा नियोजन किंवा उद्योग व त्यात खेळत्या भांडवलाचे महत्व माहित नसल्यामुळे व संपत्तीविषयी योग्य कायदेशीर बाबी योग्य वेळी न हाताळल्यामुळे बहुसंख्य श्रीमंत मराठी माणसे छोट्या मोठ्या नोकर्‍याच करत आहेत. ३ कोटी रुपये भांडवल जर आज चांगल्या रीतीने व्यवसायासाठी वापरले, तर वर्षाला किमान १० ते १२ कोटींचा टर्नओव्हर सहज करता येईल. त्यामधून किमान २ ते ३ कोटींचा निव्वळ नफा राहू शकतो, म्हणजे प्रत्येक वर्षाला संपत्ती दुप्पट होते. समजा तुमच्याकडे घर घेण्यासाठी ५० लाख रुपये असतील, तरीसुध्दा होम लोन काढून घर घ्या व पैसे व्यापारामध्ये खेळते भांडवल म्हणून वापरा त्यात तुम्ही दोन कोटींचा व्यवसाय करून वर्षात ३० लाखांपर्यंत नफा कमवता येईल. सहा लाखात २० तोळे सोने घेण्यापेक्षा ते बँकेत ठेवा त्यावर लोन घ्या व खेळत भांडवल म्हणून वापरा. जितके जास्त खेळते भांडवल धंद्याला वापराल, तितका जास्त टर्नओव्हर कराल व जास्त फायदा मिळवत राहाल.

आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा. 

सदैव आपला,
प्रसन्न कुमार नेवे.


Tuesday, December 18, 2018

'लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन शिका’ जीवनात व उद्योगात प्रचंड यश मिळवा.

सर्वसाधारण १९ व्या शतकात लॉं ऑफ अ‍ॅट्रॅक्शन ही फिलॉसॉफी उदयास आली. २० व्या शतकात नेपोलियन हिलच्या ‘थिंक अँड ग्रो रीच’ व लुईस हे च्या ‘यु कॅन हिल युवर लाईफ’ या गाजलेल्या पुस्तकाने या फिलॉसॉफीला जगभर पोहचवण्याचे मोठे कार्य केले. ज्यांना स्वतःच्या शैक्षणिक जीवनात व उद्योगात परमोच्च यश गाठायचे आहे त्यांना ही फिलॉसॉफी समजणे, शिकणे व आत्मसात करणे खूप महत्वाची आहे. शाहरुख खानचा एक डायलॉग आहे कि, “अगर किसी चीज को दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश मे लग जाती है।” हा डायलॉग सुध्दा लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शनच्या फिलॉसॉफीवर आधारित आहे. पावलो कोएलोची द अलकेमिस्ट ही कादंबरी सुध्दा तंतोतंत ह्याच फिलॉसॉफीवर आधारित आहे. तब्बल ६० ते ७० भाषेत मिळणारी व ७ ते ८ कोटी खपलेली या जगप्रसिध्द कादंबरीने खपाचे अनेक रेकॉर्ड केले. ज्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे त्याने ही जरूर वाचावी.

जर तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडावी असे वाटत असेल उदा. चांगली मुलगी जीवन साथीदार म्हणून मिळावी, चांगली नोकरी मिळावी, मोठ्या उद्योगाचे मालक व्हावे, एखाद्या स्पर्धेत गोल्ड मिडल मिळावे, शाळेत पहिला नंबर यावा इत्यादी काहीही आणि हे जर तुमच्या मनाला व शरीराच्या प्रत्येक अणू रेणूला वाटत असेल, तर निसर्गतः तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी मिळण्यासंबधित घटना आपोआप घडत जातात. असे का होते ते सांगणारे शास्त्र व फिलॉसॉफी म्हणजेच लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन होय. ज्याच्या खिशात आज १ रुपयाही नाही व त्याने ही फिलॉसॉफी समजून काम सुरू केले, तर तो कोट्याधीश होऊ शकतो, ज्याला हवे ते परमोच्च यश मिळू शकते, त्याला हवी ती प्रिय व्यक्ती जीवनात आणू शकतो, हव्या त्या देशात प्रवास करू शकतो. शाळेत हवे तेवढे गुण मिळवू शकतो. स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवू शकतो हवी तेवढी संपत्ती, जमीन, बंगले घेऊ शकतो, नाव आणि प्रतिष्ठा मिळवू शकतो. लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन शिका व जीवनात व उद्योगात प्रचंड यश मिळवा.

आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.

आपला परमस्नेही,
प्रसन्न कुमार कानळदेकर(नेवे).

Monday, December 17, 2018

शेअर बाजार आणि पूर्वदुषिताग्रह!

फक्त ३% भारतीय हे शेअर बाजारात सरळ किंवा म्युच्युअल फंङच्या माध्यमातुन गुंतवणुक करतात. याचा अर्थ ९७ % भारतीय म्हणजे तब्बल १२१ कोटी जनता अजुनही शेअर बाजारा पासुन कोसो दुर आहे.

काही जण त्याला सट्टा म्हणतात, तर काही जण त्याला जूगार म्हणुन हिणवतात. काही जणाकङे तर नाकारण्यासाठी विशेष अस कारण पण नसतं.

आता हेच बघा ना,
अामच्या एका ओळखीच्या गृहस्थाने स्वत:चा साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलाला इन्फोसिंस कंपनीत चांगल्या पगारावर नौकरी लागल्यावर गावभर पेढे वाटले. कारण तो लहान असल्यापासुन त्याला तिथ नौकरी लागावी अस स्वप्न म्हणे त्यांनी बघितलं होतं ..

तुमच्याकङे इन्फोसिंस कंपनीचे काही शेअर्स आहेत का अस विचारल्यावर, 
" मी असा सट्टा लावत नाही" 

अस त्यांच उत्तर होत याला काय
म्हणाव...??
.
म्हणजे कंपनी चांगली आहे म्हणुन त्यांना त्यांचा मुलगा तिथे नौकरीला लागायला हवा होता पण त्याच कंपनीच्या कामगिरीचा आरसा असलेल्या कंपनीचे शेअर्स घेण म्हणजे जुगार लावण अस त्यांना वाटत होत.. एवढा हा विरोधाभास होता.

तीच गोष्ट एक बॅंकर असलेल्या व्यक्तीची..

SBI बॅकेत गेल्या २० वर्षापासून नौकरी करत असलेल्या व आमच्या शेजारी रहात असलेल्या या गृहस्थाचा किस्सा तर खुपच मजेशीर आहे.

त्यांनी १ जूलै २००० साली त्यांच्याच SBI बॅकेत ५ लाख रु. FD केली होती. त्यावेळी २ वर्षाच्या असलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी म्हणून त्यांनी ही FD केली होती. आज तिचे मुल्य २६ लाख रु. झाल्याच ते मला अभिमानाने सांगत होते पण माझ्या चेहर्‍यावर आनंदाची छटा न दिसल्यावर त्यांनी काय झाल अस विचारलं..

मी म्हणालो, "साहेब.. तुम्हाला "दिर्घ कालावधी साठी गुंतवणुक करायची होती" तर, तुम्ही FD न करता त्यावेळी "चांगल्या कंपनी च्या शेअर्स किंवा इक्विटी फंङात" गुंतवणुक का नाही केली??"

ते म्हणाले, "अहो , त्या शेअर बाजाराच काय खरय..? उद्या कंपनी बुङाली तर मुलाच शिक्षण कसं करणार?"

मी म्हणालो, "मग तुमच्याच बॅकेचे शेअर्स का नाही घेतले. ती तर सरकारीच आहे ना मग बुङायची तर भीतीच नव्हती."

म्हणाले, " अहो त्यातला परतावा खात्रीचा नसतो ना ..!!"

आता मात्र मला रहावेना , आता मी त्यांना जे काही दाखवणार होतो त्यामुळे ते नक्कीच पश्चाताप करणार होते. पण निदान हा वारसा पुढे जावु नये व त्यांच्या पुढील पिढीने तरी तीच चुक परत करु नये यासाठी मला हे पाऊल ऊचलण भागच होत.

मी त्यांना एक वही व पेन घेवुन माझ्या आॅफीसमध्ये बसवले.

त्यांनी ज्या दिवशी बॅंकेत FD केली त्या १ जुलै २००० रोजीचा SBI च्या एका शेअरचा भाव होता २२ रु. म्हणजे ५ लाख रु मध्ये तब्बल २२,७२७ शेअर्स आले असते हे मी त्यांना इंटरनेटवर दाखवल.

मधल्या काळात १ शेअरचे १० शेअर्समध्ये विघटन झाल म्हणजे आज त्या २२,७२७ शेअर्सची एकुण संख्या २,२७,२७० आणि आता एक शेअरचा भाव आहे २२० रु.

आता त्यांना म्हटलं हिशोब करा कि, या सर्व शेअर्सच आताच एकुण मुल्य किती असेल..?

२,२७,२७०x२९०= ६,५९,०८,३००रु. दिनांक १७-१२-२०१८चे बाजार मूल्य.

म्हणजे तब्बल ६.६ करोङ रु. शिवाय शेअर्समधून दरवर्षी मिळालेल्या करमुक्त ङिविङंङची एकूण रक्कम होती ७९ लाख रु.

नफा + ङिवीङंङ अशा एकुण ७.३८ करोङ रु एवढ्या रकमेवर फक्त एका शुल्लक व पुर्वग्रहदुषित असलेल्या गृहीतकापायी त्यांनी अक्षरश: पाणी सोङल होत. 

अगदी एसेट अलोकेशन करत अर्धी रक्कम जरी त्यांनी शेअर्स किंवा इक्विटी फंङात गुंतवली असती तरी परतावा या २६ लाखापेक्षा निश्चीतच कितीतरी जास्त आला असता.

आता मात्र ते पस्तावल्या सारखे दिसत होेते कारण संपुर्ण २० वर्षाच्या नौकरीत पण त्यांनी एवढे पैसे मिळवले नव्हते.

अर्थात् त्यांच्या भावना दुःखाव्यात असा माझा मुळीच हेतु नव्हता. तर दिर्घकालीन गुंतवणुक ही केवळ चांगल्या इक्विटी फंङ किंवा चांगल्या शेअर्स आणि रियल इस्टेट इ. मध्ये विभागुन करावी एवढच मला त्यांना सांगायच होत.

"शहाणा माणूस हा नेहमी दुसर्‍याच्या अनूभवातुन शिकत असतो अस म्हणतात. जुन्या व बुरसटलेल्या विचारसरणीवर विसबुंन न राहता आपल्या गूंतवणुकीची नव्याने मांङणी करने हा एक संदेशच या उदाहरणातून आपल्याला मिळतो.....!!"

आपला,
प्रसन्न कुमार नेवे (कानळदेकर).