फक्त ३% भारतीय हे शेअर बाजारात सरळ किंवा म्युच्युअल फंङच्या माध्यमातुन गुंतवणुक करतात. याचा अर्थ ९७ % भारतीय म्हणजे तब्बल १२१ कोटी जनता अजुनही शेअर बाजारा पासुन कोसो दुर आहे.
काही जण त्याला सट्टा म्हणतात, तर काही जण त्याला जूगार म्हणुन हिणवतात. काही जणाकङे तर नाकारण्यासाठी विशेष अस कारण पण नसतं.
आता हेच बघा ना,
अामच्या एका ओळखीच्या गृहस्थाने स्वत:चा साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलाला इन्फोसिंस कंपनीत चांगल्या पगारावर नौकरी लागल्यावर गावभर पेढे वाटले. कारण तो लहान असल्यापासुन त्याला तिथ नौकरी लागावी अस स्वप्न म्हणे त्यांनी बघितलं होतं ..
तुमच्याकङे इन्फोसिंस कंपनीचे काही शेअर्स आहेत का अस विचारल्यावर,
" मी असा सट्टा लावत नाही"
अस त्यांच उत्तर होत याला काय
म्हणाव...??
.
म्हणजे कंपनी चांगली आहे म्हणुन त्यांना त्यांचा मुलगा तिथे नौकरीला लागायला हवा होता पण त्याच कंपनीच्या कामगिरीचा आरसा असलेल्या कंपनीचे शेअर्स घेण म्हणजे जुगार लावण अस त्यांना वाटत होत.. एवढा हा विरोधाभास होता.
तीच गोष्ट एक बॅंकर असलेल्या व्यक्तीची..
SBI बॅकेत गेल्या २० वर्षापासून नौकरी करत असलेल्या व आमच्या शेजारी रहात असलेल्या या गृहस्थाचा किस्सा तर खुपच मजेशीर आहे.
त्यांनी १ जूलै २००० साली त्यांच्याच SBI बॅकेत ५ लाख रु. FD केली होती. त्यावेळी २ वर्षाच्या असलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी म्हणून त्यांनी ही FD केली होती. आज तिचे मुल्य २६ लाख रु. झाल्याच ते मला अभिमानाने सांगत होते पण माझ्या चेहर्यावर आनंदाची छटा न दिसल्यावर त्यांनी काय झाल अस विचारलं..
मी म्हणालो, "साहेब.. तुम्हाला "दिर्घ कालावधी साठी गुंतवणुक करायची होती" तर, तुम्ही FD न करता त्यावेळी "चांगल्या कंपनी च्या शेअर्स किंवा इक्विटी फंङात" गुंतवणुक का नाही केली??"
ते म्हणाले, "अहो , त्या शेअर बाजाराच काय खरय..? उद्या कंपनी बुङाली तर मुलाच शिक्षण कसं करणार?"
मी म्हणालो, "मग तुमच्याच बॅकेचे शेअर्स का नाही घेतले. ती तर सरकारीच आहे ना मग बुङायची तर भीतीच नव्हती."
म्हणाले, " अहो त्यातला परतावा खात्रीचा नसतो ना ..!!"
आता मात्र मला रहावेना , आता मी त्यांना जे काही दाखवणार होतो त्यामुळे ते नक्कीच पश्चाताप करणार होते. पण निदान हा वारसा पुढे जावु नये व त्यांच्या पुढील पिढीने तरी तीच चुक परत करु नये यासाठी मला हे पाऊल ऊचलण भागच होत.
मी त्यांना एक वही व पेन घेवुन माझ्या आॅफीसमध्ये बसवले.
त्यांनी ज्या दिवशी बॅंकेत FD केली त्या १ जुलै २००० रोजीचा SBI च्या एका शेअरचा भाव होता २२ रु. म्हणजे ५ लाख रु मध्ये तब्बल २२,७२७ शेअर्स आले असते हे मी त्यांना इंटरनेटवर दाखवल.
मधल्या काळात १ शेअरचे १० शेअर्समध्ये विघटन झाल म्हणजे आज त्या २२,७२७ शेअर्सची एकुण संख्या २,२७,२७० आणि आता एक शेअरचा भाव आहे २२० रु.
आता त्यांना म्हटलं हिशोब करा कि, या सर्व शेअर्सच आताच एकुण मुल्य किती असेल..?
२,२७,२७०x२९०= ६,५९,०८,३००रु. दिनांक १७-१२-२०१८चे बाजार मूल्य.
म्हणजे तब्बल ६.६ करोङ रु. शिवाय शेअर्समधून दरवर्षी मिळालेल्या करमुक्त ङिविङंङची एकूण रक्कम होती ७९ लाख रु.
नफा + ङिवीङंङ अशा एकुण ७.३८ करोङ रु एवढ्या रकमेवर फक्त एका शुल्लक व पुर्वग्रहदुषित असलेल्या गृहीतकापायी त्यांनी अक्षरश: पाणी सोङल होत.
अगदी एसेट अलोकेशन करत अर्धी रक्कम जरी त्यांनी शेअर्स किंवा इक्विटी फंङात गुंतवली असती तरी परतावा या २६ लाखापेक्षा निश्चीतच कितीतरी जास्त आला असता.
आता मात्र ते पस्तावल्या सारखे दिसत होेते कारण संपुर्ण २० वर्षाच्या नौकरीत पण त्यांनी एवढे पैसे मिळवले नव्हते.
अर्थात् त्यांच्या भावना दुःखाव्यात असा माझा मुळीच हेतु नव्हता. तर दिर्घकालीन गुंतवणुक ही केवळ चांगल्या इक्विटी फंङ किंवा चांगल्या शेअर्स आणि रियल इस्टेट इ. मध्ये विभागुन करावी एवढच मला त्यांना सांगायच होत.
"शहाणा माणूस हा नेहमी दुसर्याच्या अनूभवातुन शिकत असतो अस म्हणतात. जुन्या व बुरसटलेल्या विचारसरणीवर विसबुंन न राहता आपल्या गूंतवणुकीची नव्याने मांङणी करने हा एक संदेशच या उदाहरणातून आपल्याला मिळतो.....!!"
आपला,
प्रसन्न कुमार नेवे (कानळदेकर).

No comments:
Post a Comment