Friday, February 15, 2019

THUMB RULE OF FINANCIAL PLANNING

Thumb Rule of Financial planning.

1. 30 % of your income must be used for *monthly living expenses.*
2. 30% of your income must be used for *Liabilities repayments*, if any..
3. 30% of your income must be *SAVED* and *INVESTED* for your future LIVING.
4. 10% of your income must be spared for *entertainments, vacations*
5. 6 months expenses must be available for *emergency fund* (should be invested in LIQUID FUND, FD Etc)
6. *Home loan* must be registered and apply on both *husband and wife name.* (Both can get benefits on Home loan Tax benefits)
7. Buying *second house for investment is not advisable* ( _Survey reports - it will fetch you only around 3% return_)
8. After 45 years of age, *not supposed to enter into any BIG LIABILITIES* (Higher education of children and wedding of children will happen around 45 to 50 only, so plan now for the same.)
9. Have joint account @ Bank savings account.
10. Property must be *registered on both Husband and wife name*. (As per legal act – after husband first legal heir is wife, after wife it will go to children only)
11. Regular check on *Nominations at all financial instruments.* if not nominated, do it now..
12. Only in insurance policy, Claims payable to Nominee. In other financial instruments legal heirs certificate is must to get back the settlement
13. Must have *Term Insurance* to financially secure future of your dependants..
14. *Don’t take any financial investment decisions EMOTIONALLY*, and also Avoid last minute tax saving investment decisions, plan well in advance..
15. *MEDICLAIM is must* (in spite of Group mediclaim coverage given at office) (After retirement there is no mediclaim coverage, after 50-55 years of age, it's very tough and costly to enter into mediclaim)
16. For your *jewelry LOCKER*, Only one lakh is payable by bank, if theft or fire happen at bank. Provided insurance done.
17. Like same way *Government guaranteed only one lakh for your FD* also. (Fixed deposits with Banks upto Rs. 1 lakh only are backed by deposit insurance)
18. Must know all *Tax implications.* You cannot avoid paying tax. But you can minimize by way of tax planning and investments..

Monday, February 4, 2019

अर्थसाक्षरतेच्या दिशेने भाग १ - कर आणि नियोजन ...

अर्थसाक्षरतेच्या दिशेने   भाग १ - कर आणि नियोजन ...
------------------------------
१. सरते आर्थिक वर्ष आणि कर नियोजन
------------------------------
अजून थोड्याच दिवसात हे आर्थिक वर्ष संपेल. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेऊन करबचत करणे शक्य असून आज आपण त्यांना मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेऊया. 

आपणास कर किती लागू शकतो याचा अंदाज घ्या. २०१८/१९ या आर्थिक वर्षासाठी सर्व मार्गाने मिळणारे एकूण करपात्र उत्पन्न ₹ २ लाख ५० हजारांच्या आत असेल, तर आपणास कोणताही आयकर द्यावा लागत नाही. जर आपले वय ६० हून अधिक असेल, तर करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ₹ ३ लाख व आपण अतिवरिष्ठ नागरिक असाल म्हणजेच आपले वय 80 पेक्षा जास्त असेल, तर ही मर्यादा ₹ ५ लाख एवढी आहे. लक्षात घ्या उत्पन्नावर कर आहे खर्चावर नाही (त्यासाठी GST आहे.) आपले सर्व मार्गाने होणारे एकूण उत्पन्न यासाठी विचारात घेणे जरुरीचे आहे. यातून बचत आणि गुंतवणूक केलेली एकूण विहीत मर्यादेतील रकमेची सूट घेऊन निव्वळ करपात्र उत्पन्न काढता येते. यातील २.५ लाख ते ५ लाखापर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर ५% त्यावरील १० लाख रुपयापर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर ₹ १२५०० + २०% आणि त्यावरील करपात्र उत्पन्नावर ₹ १,१२,५०० + ३०% या दराने आयकर लागतो. या एकूण करावर सरचार्ज म्हणून ४% दराने शिक्षण व उच्चशिक्षण कर द्यावा लागतो. ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५० लाखांच्यावर परंतू  १ कोटींच्या आत आहे, त्यांना करावर १०% आणि १ कोटींहून अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना १५% अतिरिक्त सरचार्ज द्यावा लागतो. हा एकूण करदायित्वांवरील कर आहे (Tax on tax); तर 60 वर्षांखालील ज्यांचे एकूण करपात्र उत्पन्न ₹ ३ लाखांच्या आत आहे आणि ज्यांचे वय ६० पेक्षा अधिक असून करपात्र उत्पन्न ₹ ३.५ लाख आहे त्यांना आयकर अधिनियम 87/A अनुसार जास्तीत जास्त ₹ २५००/- ची कर सूट एकूण देय करात मिळू शकते. म्हणजेच एकूण करातून जास्तीत जास्त २५००/-रुपये कमी द्यावे लागतात. याशिवाय पगारदार लोकांना सेक्शन 4/A नुसार ₹ ४००००/- ची प्रमाणित वजावट (Standard deduction) मिळेल. तसेच त्यांचा कापलेला अधिकतम व्यवसाय कर एकूण उत्पन्नातून वजा होईल.

आयकरासाठी ज्याप्रमाणे सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला जातो त्याचप्रमाणे विविध बचत, गुंतवणूक आणि खर्च यांना विहित मर्यादेत सूट दिली जाते.

यातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे -

१) विविध बचत गुंतवणूक योजना व खर्चांना मिळणाऱ्या सवलती : यामध्ये विहित मर्यादेत जमा केलेली रक्कम एकत्रित उत्पन्नातून कमी होत असल्याने एकूण करदायित्व कमी होते. आयकर अधिनियम 80/C, 80/CCC, 80/CCD एकत्रित मिळून जास्तीत जास्त दीड लाख रुपये सूट मिळू शकते.  

80/C ची सवलत मिळणाऱ्या अनेक योजना व खर्च आहेत. कंसात योजनेवरील १ जानेवारी 2019 ला मिळू शकणारे व्याजदर दिले आहेत. यामध्ये पी एफ वर्गणी (८.५५%,वी पी एफ ८.५५% ,पी पी एफ (८%) मधील जमा केलेली रक्कम ,एन एस सी (७.७%) , एन एस सी व्याज, ५ वर्ष मुदतीच्या करबचत मुदत ठेवी (जास्तीत जास्त ७ ते ८%), वरिष्ठ नागरिक बचत योजना (८.७%) ,सुकन्या समृद्धी योजना (८.५%), विमा हप्ते, गृहकर्ज मूद्दल, रजिस्ट्रेशन खर्च, दोन मुलांचा शैक्षणिक खर्च, करबचतीच्या समभाग संलग्न योजना यांमध्ये  जमा/खर्च केलेली रक्कम यांचा समावेश होतो.

80/CCC मध्ये विमा कंपन्या व म्यूचुअल फंडाच्या पेन्शन योजनांचा समावेश होतो.

80/CCD मधे केंद्रीय कर्मचाऱ्याच्या नवीन पेन्शन योजनेच्या वर्गणीचा समावेश होतो. यापैकी एक अथवा अनेक ठिकाणी जमा केलेली रक्कम जास्त होत असली, तरी एकूण सूट दीड लाख एवढीच मिळते. २०१५ पासून 80/CCD(1B) नुसार एन पी एस मध्ये जमा केलेल्या ₹ ५००००/- रुपयांवर अतिरिक्त सूट मिळते अशाप्रकारे एकूण जास्तीत जास्त दोन लाख रुपये एवढी वजावट मिळू शकते.

२) आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि पुनर्वसन योजनांवर मिळणाऱ्या सवलती : यामध्ये आयकर कलम 80/D, 80/DD, 80/DDE, 80/DU यांचा सामावेश होतो. 

80/D नुसार स्वतःच्या, जोडीदाराच्या आणि दोन मुलांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यापोटी भरलेल्या रकमेवर ₹ २५०००/- जमाकर्ता जेष्ठ नागरिक असेल तर ₹ ५००००/- पर्यंत सूट मिळते. त्याचप्रमाणे जमाकर्त्यावर अवलंबित पालकांसाठी भरलेल्या हप्त्यावर त्यांच्या वयानुसार अतिरिक्त २५ ते ५० हजार रुपयांची सूट मिळते. तेव्हा या कलमानुसार किमान ₹ २५ हजार ते कमाल १ लाख रुपयांची सूट मिळू शकते.

80/DD नुसार अवलंबित अपंग जोडीदार, मूल, पालक, भाऊ, बहीण यांचे वैद्यकीय उपचार, कल्याणकारी विमा योजनेचा भरलेला हप्ता यावर केलेला खर्च हा अपंगत्वाचे प्रमाणानुसार ₹ ७५ हजार ते ₹ १ लाख २५ हजार पर्यंत आहे असे गृहित धरून सूट घेता येते यासाठी खर्चाच्या पुराव्याची कोणतीही गरज नाही .

80/DDB या कलमानुसार स्वतःसाठी, जोडीदारासाठी, मूल, अवलंबित भाऊ, बहीण, आई, वडील यांच्यावर काही विशिष्ट आजारावर केलेल्या खर्चाबद्द्ल वयानुसार ₹ ४० हजार ते १ लाख रुपयांची सूट घेता येते. 

80/DU या कलमानुसार अपंग करदात्यास त्याच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार त्याच्या उत्पन्नातून ₹ ७५ हजार ते १ लाख २५ हजारांची सूट मिळू शकते. त्याचप्रमाणे अनेक राज्यात अपंग करदात्यांना आणि त्यांच्या पालकांना व्यवसाय कर (Profesitional Tax) माफ करण्यात आला आहे.

३) विविध कर्जावरील व्याजावर मिळणारी सूट : यामध्ये आयकर कलम 80/E, Section 24, 80/EE यांचा समावेश होतो.

80/E नुसार स्वतःसाठी, जोडीदारासाठी अथवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज कर्ज घेतल्यापासून ८ वर्षांपर्यंत कोणत्याही मर्यादेशिवाय सूट मिळण्यासाठी पात्र आहे. 

Section 24 नुसार गृहकर्जावरील व्याजाला जास्तीत जास्त २ लाख रुपयांची व घरदुरुस्ती कर्जावर ३० हजार रुपयांची सूट मिळते.

80/EE नुसार पहिल्यांदा घरासाठी कर्ज घेणाऱ्या आणि एकमेव घर असणाऱ्या व्यक्तीस ५० हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळते.

४) विविध दान आणि मदतनिधीस मिळणारी सूट : यामध्ये कलम 80/G व 80/GGC यांचा समावेश होतो.

80/G नुसार मान्यताप्राप्त संस्था, न्यास यांना दिलेल्या एकूण उत्पन्नाच्या १०% मर्यादेत ५० ते १००%सूट मिळते.

80/GGC नुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षास दिलेल्या देणगीतून एकूण उत्पन्नाच्या मर्यादेत ५०% पर्यंत सूट मिळते.

५) इतर काही कलमानुसार मिळणाऱ्या सवलती : यामध्ये 80/GG, 80/TTA यांचा समावेश होतो.
80/GG मध्ये काही अटींची पूर्तता केल्यास दरमहा ५ हजार रुपये एवढी घरभाड्याची वजावट मिळू शकते.

80/TTA या कलमानुसार बचत खात्यातील रकमेवर मिळालेले १० हजार रुपयावरील व्याज ६० वर्षाच्या आतील करदात्यांना करमुक्त आहे, तर 80/TTB नुसार वरिष्ठ व अतिवरिष्ठ नागरिकांस ₹ ५० हजार वरील व्याज करमुक्त आहे.

या ठळक तरतुदींशिवाय शेअर खरेदीविक्रीतून काही अटींसह अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर मुळातून एस टी टी कापला असेल सवलतीच्या दराने १५%कर, तर ₹ १ लाखांहून अधिक दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर काही अटींसह १०% कर द्यावा लागेल. भांडवल बाजारातील कंपन्यांनी आणि ६५% हून अधिक समभाग असणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या योजनांनी दिलेला लाभांश त्यावरील देय आधीच कर मुळातून कापून घेतल्याने धारकास करमुक्त आहे. वेगवेगळ्या पायाभूत सुविधा पुरवणारे करमुक्त कर्जरोख्यावरील (Tax free infrastructure bonds) व्याज करमुक्त आहे. या तरतुदींशिवाय इतर अनेक तरतुदींमुळे आपली करदेयता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. वर फक्त सर्वसमावेशक तरतुदींचा विचार केला आहे. यातील प्रत्येक तरतुदीवर स्वतंत्रपणे तपशीलवार लेख लिहिता येऊ शकेल.

या सर्व तरतुदी त्यातील अटींसह www.incometaxindia.gov.in या आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या पहाव्यात अथवा सनदी लेखपालासारख्या (CA) तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.आपल्या करविषयक कोणत्याही शंकांचे निराकरण आपण www.taxguru.in या संकेतस्थळावर भेट देऊन सुद्धा करु शकता.

प्रसन्न कुमार नेवे.
wealthplanning01@gmail.com
--------------------------------------

Tuesday, December 25, 2018

जास्तीजास्त भांडवल खेळतं करा

जास्तीजास्त भांडवल खेळतं करा
-----------------------------------------
मला एक मोठं कुटुंब भेटावयास आले. एक लहान भाऊ, दोन विवाहित भाऊ, एक बहीण, आई. दोन भाऊ कुठेतरी छोटीशी नोकरी करत होते. बहिणीचा नवराही खाजगी नोकरी करत होता. वडिलांचं ३ वर्षांपूर्वी निधन झालं होतं. लहान भावाचं इंजिनीअरिंग झालं होतं. त्याला नोकरीत रस नव्हता त्याला व्यवसाय करायचा होता, पण भांडवल नव्हतं. कुटुंबाच्या  एकत्रित ५ ठिकाणी प्रॉपर्टीज होत्या, त्यामध्ये जुनी घरे, चाळी, जमीन इत्यादी बर्‍याच ठिकाणी वाद होते, टायटल क्लिअर नव्हते, धड त्या विकता येत नाहीत आणि डेव्हलपही करता येत नाहीत किंवा लोन मिळत नव्हते. योग्य वेळी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता. ७/१२ व ८अ वर अजून त्या मुलांच्या आत्यांची नाव होती. काही जागा पगडी पध्दतीने भाड्याने दिली होती. एकूण प्रॉपर्टीची व्हॅल्यूएशन ३ कोटीपर्यंत होतं, पण एवढ्या संपत्तीचे मालक दोघे भाऊ १२-१५ हजार रुपये पगाराची नोकरी करत होते व चाळीतल्या खोलीत राहून कसेतरी उदरनिर्वाह करीत होते. विवाहित बहीणीची तीच अवस्था. ती एका कंपनीत कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होती. हे जेथे नोकरीस होते त्या मालकांपेक्षा यांची संपत्ती जास्त होती. लहान भाऊ आधुनिक विचारांचा होता. त्याला नवीन तंत्रज्ञान, व्यापार याची जाण होती, इतर व्यापारी समाज कसे पुढे चालले आहेत, हे त्याला कळत होते, पण कुटुंबाची ३ कोटींची प्रॉपर्टी असून सुध्दा त्याला १५-२० लाख रुपये भांडवल उभे करणे शक्य नव्हते. 

अशी अनेक मराठी कुटुंबे आहेत. ज्यांची चांगली संपत्ती आहे, पण त्याचे व्यापारात खेळतं भांडवल म्हणून उपयोग होत नाही. त्यामुळे संपत्ती किंवा भांडवलाची ताकद असूनसुध्दा नियोजन किंवा उद्योग व त्यात खेळत्या भांडवलाचे महत्व माहित नसल्यामुळे व संपत्तीविषयी योग्य कायदेशीर बाबी योग्य वेळी न हाताळल्यामुळे बहुसंख्य श्रीमंत मराठी माणसे छोट्या मोठ्या नोकर्‍याच करत आहेत. ३ कोटी रुपये भांडवल जर आज चांगल्या रीतीने व्यवसायासाठी वापरले, तर वर्षाला किमान १० ते १२ कोटींचा टर्नओव्हर सहज करता येईल. त्यामधून किमान २ ते ३ कोटींचा निव्वळ नफा राहू शकतो, म्हणजे प्रत्येक वर्षाला संपत्ती दुप्पट होते. समजा तुमच्याकडे घर घेण्यासाठी ५० लाख रुपये असतील, तरीसुध्दा होम लोन काढून घर घ्या व पैसे व्यापारामध्ये खेळते भांडवल म्हणून वापरा त्यात तुम्ही दोन कोटींचा व्यवसाय करून वर्षात ३० लाखांपर्यंत नफा कमवता येईल. सहा लाखात २० तोळे सोने घेण्यापेक्षा ते बँकेत ठेवा त्यावर लोन घ्या व खेळत भांडवल म्हणून वापरा. जितके जास्त खेळते भांडवल धंद्याला वापराल, तितका जास्त टर्नओव्हर कराल व जास्त फायदा मिळवत राहाल.

आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा. 

सदैव आपला,
प्रसन्न कुमार नेवे.


Tuesday, December 18, 2018

'लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन शिका’ जीवनात व उद्योगात प्रचंड यश मिळवा.

सर्वसाधारण १९ व्या शतकात लॉं ऑफ अ‍ॅट्रॅक्शन ही फिलॉसॉफी उदयास आली. २० व्या शतकात नेपोलियन हिलच्या ‘थिंक अँड ग्रो रीच’ व लुईस हे च्या ‘यु कॅन हिल युवर लाईफ’ या गाजलेल्या पुस्तकाने या फिलॉसॉफीला जगभर पोहचवण्याचे मोठे कार्य केले. ज्यांना स्वतःच्या शैक्षणिक जीवनात व उद्योगात परमोच्च यश गाठायचे आहे त्यांना ही फिलॉसॉफी समजणे, शिकणे व आत्मसात करणे खूप महत्वाची आहे. शाहरुख खानचा एक डायलॉग आहे कि, “अगर किसी चीज को दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश मे लग जाती है।” हा डायलॉग सुध्दा लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शनच्या फिलॉसॉफीवर आधारित आहे. पावलो कोएलोची द अलकेमिस्ट ही कादंबरी सुध्दा तंतोतंत ह्याच फिलॉसॉफीवर आधारित आहे. तब्बल ६० ते ७० भाषेत मिळणारी व ७ ते ८ कोटी खपलेली या जगप्रसिध्द कादंबरीने खपाचे अनेक रेकॉर्ड केले. ज्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे त्याने ही जरूर वाचावी.

जर तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडावी असे वाटत असेल उदा. चांगली मुलगी जीवन साथीदार म्हणून मिळावी, चांगली नोकरी मिळावी, मोठ्या उद्योगाचे मालक व्हावे, एखाद्या स्पर्धेत गोल्ड मिडल मिळावे, शाळेत पहिला नंबर यावा इत्यादी काहीही आणि हे जर तुमच्या मनाला व शरीराच्या प्रत्येक अणू रेणूला वाटत असेल, तर निसर्गतः तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी मिळण्यासंबधित घटना आपोआप घडत जातात. असे का होते ते सांगणारे शास्त्र व फिलॉसॉफी म्हणजेच लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन होय. ज्याच्या खिशात आज १ रुपयाही नाही व त्याने ही फिलॉसॉफी समजून काम सुरू केले, तर तो कोट्याधीश होऊ शकतो, ज्याला हवे ते परमोच्च यश मिळू शकते, त्याला हवी ती प्रिय व्यक्ती जीवनात आणू शकतो, हव्या त्या देशात प्रवास करू शकतो. शाळेत हवे तेवढे गुण मिळवू शकतो. स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवू शकतो हवी तेवढी संपत्ती, जमीन, बंगले घेऊ शकतो, नाव आणि प्रतिष्ठा मिळवू शकतो. लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन शिका व जीवनात व उद्योगात प्रचंड यश मिळवा.

आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.

आपला परमस्नेही,
प्रसन्न कुमार कानळदेकर(नेवे).